spot_img
spot_img

💥राजकीय! मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट! – नेमका काय प्रस्ताव मांडला?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालय आणि विदयापीठ निर्माण करावे तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील शासकीय कर्मच्या-यांना आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना ॲलोपॅथी सोबतच आयुर्वेदिक उपचारही मोफत मिळावा असा प्रस्ताव केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला आहे.

केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव हे 8 जानेवारीला मुंबई दौ-यावर असतांना त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना करुन देशात आयुर्वेद उपचार पध्दतीला नविन दालन उपलब्ध करुन दिले आहे. देशातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीकोनातुन हर घर आयुर्वेद उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने विविध उपक्रम आणि उपचार पध्दती संदर्भाची माहीती नागरीकांपर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात येत आहे. आयुर्वेदीक उपचार पध्दतीला देशातील नागरीकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी नविन स्वतंत्र मंत्रालयाची आणि आयुष विदयापीठाची निर्मीती करण्यात यावी या संदर्भांचा प्रस्ताव त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातुन सार्वजनिक आरोग्य, संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण, जागतिकीकरण आणि गुणवत्ता वाढीसाठी भरीव काम करण्यात येत आहे. देशाअंतर्गत आयुर्वेद उपचार पध्दतीचा स्विकार नागरीक करु लागले आहे. महाराष्ट्रातील लोकही प्राचीन आयुर्वेद उपचार पध्दतीचा अवलंब करत असल्याने आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातुन स्वतंत्र आयुष मंत्रालय किंवा आयुष विभाग स्थापन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मच्या-यांना राज्यस्थान दिल्ली व अन्य राज्यामध्ये मधुमेह, मूळव्याध, त्वचारोग, व इतर आजारांवर ॲलोपॅथीसोबतच आयुर्वेद उपचार मोफत मिळतो. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मच्या-यांना मोफत आयुर्वेद उपचार मिळावा असा प्रस्तावही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी मांडला. या प्रस्तावा संदर्भांत मुख्यमंत्री आणि केंद्रीय आयुषमंत्री यांच्या विचारविमश होवुन लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांना दिले. यावेळी आमदार संजय कुटेही उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!