spot_img
spot_img

EXCLUSIVE! कोडीन फॉस्फेट, गांजा,बाँन्डची नशागिरी! – अल्पवयीन व तरुणाईचा ‘झिंगाट’ कार्यक्रम!

डोणगाव (हॅलो बुलडाणा) डोणगाव राजकारणात पुढे असते तसे नशेगिरीतही पुढेच आहे.आताची तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. पूर्वी ठराविक वयोगटातील लोक अमली पदार्थांचे सेवन करून नशा करीत असत. यात त्यांच्याकडून चरस, गांजा, अफू, सिगार, हुक्का यांचे प्रमाण अधिक होते,परंतु आता गांजाची व बॉण्डची सर्रास विक्री केली जात असल्याने तो ओढून नशा करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणांचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आताची तरुणाई व्यसनाधीनतेच्या आहारी गेली आहे. तरुणांसह अल्पवयीन मुलेदेखील वेगवेगळ्या प्रकारचा नशा करून अनुचित प्रकार करीत असल्याचे समोर आले आहे. डोणगाव येथे पसंद अपनी अपनी असा प्रकार होऊन बसलाय. बांधकाम व्यवसायावर काम करणाऱ्या युवका मध्ये झोपेच्या गोळ्यां वापरण्याचे प्रमाण वाढले. कोडीन फोस्पेट हा घटक आहे ते औषध सुद्धा कोणत्याही औषधी दुकानावर न जाता सरळ कॉल करताच घरपोच मिळते. गांजा खूप प्रसिद्ध होऊन गेला. चिलीम फुंकल्यावर डोळे लाल दिसायला नको म्हणून आय ड्रॉप,ओठावर लावण्यासाठी लीपबाम, तोंडात वास येऊनये म्हणून मींटोसची पट्टी असा सर्व जुगाड चिलिंम फुकी गॅंग सांभाळून ठेवते.अल्पवयीन मुले सोलेशन ट्यूब कॅरीबाग मध्ये रिचवून त्याला हुंगत आहे ही नशेची सामुग्री फक्त पाच रुपयाला सहज कोणत्याही जनरल स्टोअर्समध्ये मिळते.नशेचे प्रमाण वाढल्याने आता ही ट्यूब 20 रुपयाला विकली जात आहे अश्यात पालकांनी सावधान होऊन आपल्या पाल्यावर नजर ठेवण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. 31 डिसेंबरच्या सकाळी 10 वाजता दरम्यान आठवडी बाजारात काही मुलं व युवक प्लास्टिक पन्नी मध्ये सोलेशन टाकून हुंगत होते अशी मुले राज्य महामार्ग लगत असलेल्या नवीन ले आउट मध्ये, आठवडी बाजारात, ग्राऊंडवर नेहमीच दिसून येतात.मात्र यंत्रणा याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.

▪️तरुणाई भरकटली का? 

तरुणाई या अमली पदार्थाच्या विळख्यात सापडण्याची मुख्य कारणे म्हणजे शैक्षणिक अपयश, प्रेमभंग, कर्जबाजारीपणा आदी असल्याचे म्हटले जाते. तर अल्पवयीन मुले मोठ्यांचे अनुकरण करण्याच्या उद्देशाने नशेच्या या चक्रव्यूहात गुरफटू लागली आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारीतही वाढ झाली असल्याचे चित्र आहे. आपली अमली पदार्थाची नशा पूर्ण करण्यासाठी घरातील चोरीच्या घटनांत वाढ झालेली आहे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी चोऱ्या केल्या जात आहेत. तर सध्या डोकेदुखी, सर्दीच्या गोळ्या शीतपेयात टाकून नशा करणे, शिळ्या पावाला आयोडेक्स लावून नशा करणे, खोकल्याचे औषध पिऊन सिगारेट ओढणे आदींचाही वापर केला जात आहे. अनेक मेडिकलमधून याला बंदी असताना जादा पैसे देतो मला औषध द्या अशा मागण्या या नशेबाजांकडून केल्या जात आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!