spot_img
spot_img

आज छापे कुठे कुठे? – जिल्हा असाच अवैध मद्याने भिजणार का? – गांजाचा ही धूर दाटला!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘अच्छी पी ली ख़राब पी ली! जैसी पाई शराब पी ली!’ अशी मद्यपींची मानसिकता झाल्याने जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर आला आहे. शिवाय गांजाचा धुराळा जिल्ह्याचे नकाशाला झाकोळत आहे.दरम्यान आज छापे टाकले जात आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने व पोलीस यंत्रणेने प्रासंगिक नाही तर नियमित सक्रिय राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करडी नजर असल्याचा दावा केला जातोय.या विभागाने 1 मार्चपासून 2 कोटी 28 लाखांवर मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई देखील केली आहे.
परंतु सध्या स्थितीतही शहरासह जिल्ह्यात बनावट व गावठी आणि देशी दारूची बेकायदा धडाक्यात विक्री सुरू असल्याचा आरोप होतोय. सकाळी सहा वाजता पासून तर रात्री बारा वाजेपर्यंत दारूचे लोट जिल्ह्याला भिजवत आहेत. तर गांजा सर्रास विकला जात असून, तरुणाई गांजाचा धुराळा उडवतांना दिसते. त्यामुळे यंत्रणेचे हात ओले असल्याची चर्चा सुरू आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध विक्री, मद्यनिर्मीती व वाहतुक प्रकरणी 1 मार्च 2024 पासून ते आजपर्यंत विशेष मोहिम राबवून 2 कोटी 28 लक्ष 46 हजार 179 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये 1 हजार 229 व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 104 वाहन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग मो. नवलकर यांनी दिली आहे.परंतु ही कारवाई वेळप्रसंगीच होते नियमित का होत नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!