spot_img
spot_img

EXCLUSIVE! गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता मोटार वाहनांवरील ‘हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट!’ – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे म्हणाले..!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा वाहन क्रमांक प्लेट (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट – HSRP) बसविणे बंधनकारक करण्याचे वरिष्ठ स्तरावरून निर्देश असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे म्हणाले आहेत. त्यानुसार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत वाहनांवर एचएसआरपी हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक असून 31 मार्च 2025 पूर्वी ही नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एचएसआरपी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाकडून बुलढाणा उपप्रादेशिक कार्यालयात झोन 3 मध्ये मे.एफटीए एचएसआरपी सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून त्यासाठी लागणारे शुल्कही निर्धारित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अशा नंबरप्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसह वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी व्हावेत, छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी, तसेच रस्त्यांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची ओळख पटविण्याकरिता या व अशा अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोटार वाहनांवरील हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट बसविणे अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सर्व मोटार वाहनांवर अशा नंबरप्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी केले आहेत.राज्यात सन 2019 पासून नव्या उत्पादित वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट सक्तीची केली आहे. वाहनाला ही नंबरप्लेट एकदा लावल्यानंतर ती पुन्हा काढता येत नाही.अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेली नंबरप्लेट टॅम्परप्रुफ असते. ही नंबरप्लेट अल्युमिनिअम मिश्र धातूपासून बनविलेली असते. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम आणि वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत IND अशी अक्षरे लिहिलेली असतात.

▪️HSRP बुकिंग पोर्टल लिंक वर..

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा करीता Zone 3 मध्ये M/s FTA HSRP Solution
Ptv Ltd. ही एजन्सी असून HSRP बुकींग पोर्टल लिंक http://maharashtrahsrp.com आहे. तसेच
याकरीता नेमण्यात आलेल्या पुरवठादाराची यादी या कार्यालयाच्या सुचनाफलकांवर लावण्यात आली आहे. याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा http://maharashtrahsrp.com या लिंकवर देण्यात आली आहे, तसेच सदर अर्जाचे शुल्काचा भरणा ऑनलाईन करावा,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बुलढाणा ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!