बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बांधकामासाठी रेतीचा वापर होतो.पण ही रेती नदीत मर्यादित स्वरुपात असते. त्यामुळे प्रशासन पर्यावरणाचा विचार करून रेतीच्या उत्खननास परवानगी देतो. परंतु काही जण अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करतात. असाच एक विना नंबर टिप्पर आज प्रभारी जिल्हाधिकारी शेलार यांनी पकडलाय. यापूर्वीही असे 2 टिप्पर महसूल विभागाने कारवाई केली होती.परंतु उपराउपरी कारवाई होणार हे निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे.कारण वाळू तस्कर ‘पुष्पा’ आता पर्यंत झुकलेले नाहीत. बुलढाण्यात 20 ते 30 अवैध वाळू टिप्परांचा रात्री खेळ चालतोय! यांना राजकीय अभय असल्याचे बोलल्या जात आहे.
कारवाई होऊन सुद्धा पुन्हा अवैध रेती वाहतूक महसुल व पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक विभागाच्या नाकावर टिच्चून सुरू राहते हे न उलगडणार कोड आहे?
बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याच रेती घाटांचा लिलाव झालेला नाही. मराठवाडा विभागातून जाफराबाद तर देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीसह इतर नद्यांमधील रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना, मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याचे पाहायला मिळते. अवैध रेती वाहतूक करतानाचे टिप्पर सुसाट बुलढाण्यातून धावताहेत.
एखाद्या टिप्परवर प्रशासन कारवाई करते.परंतु त्या पंचनाम्याच्या कार्यवाही मध्ये पळवटा असतात,असे अनेकदा समोर आले आहे.रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे सुरु असल्याने महसूल प्रशासनाचा यांना आशिर्वाद आहे का? हा प्रश्न असून,राज्य शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. रेती उपसा सुरु प्रकरणी दबावतंत्र की अर्थकारण आहे, हा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाने रेती तस्करांसमोर नांगी टाकल्याचे जिल्ह्यात चित्र दिसत आहे.