बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बीड जिल्ह्यात सरपंचाच्या अमानुष हत्येमुळे सध्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे.बीड जिल्ह्यात नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यातही गुन्हेगारी दस्तक देत असून,गेल्या वर्षी 31 तर मावळत्या वर्षात तब्बल 40 हत्येच्या खूनी थराराने समाजमन सुन्न झाले आहे.त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर समाजासह पोलिस यंत्रणाला देखील चिंतन व मनन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या 2023 या वर्षात जिल्ह्यात 31 हत्या झाल्या होत्या.यामध्ये 50 घटना खून करण्याच्या प्रयत्नाच्या होत्या.
राज्य सरकार स्मार्ट पोलिसिंगच्या घोषणा करत असले, तरी शहरातील गुन्हेगारीचा आलेख चढताच आहे.घरफोडी, चोरी,वाहन चोरींच्या घटनांत वाढ होत आहे. व शहरांतील व ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे समोर आले असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे.खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, चोरी, वाहनचोरी, दंगल अशा घटनांत वाढ झाली आहे. मात्र अपुरे मनुष्यबळ, असुविधा आदी कारणांमुळे गुन्ह्यांची उकल करण्यात आणि चोरीला गेलाला मुद्देमाल वसूल करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. हत्यांची उकल करण्यात पोलिसांची कामगिरी चांगली असली, तरी या वर्षातील 3 खुनांचा तपास अद्याप झालेला नाही.घरफोड्या आणि चोरीच्या घटनांची आकडेवारी चिंताजनक असल्याचे माहितीतून समोर आले आहे. त्यामुळे या गुन्हेगारीची झळ बसलेल्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.