बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज थोड्यावेळापूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारपरिषद घेतली.यावेळी प्रामुख्याने महायुती ह्या निवडणूक एकत्रित लढणार असल्याचे सांगून त्यांनी भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की,माजी आमदार विजयराज शिंदे आणि योगेंद्र गोडे हे या निवडणुकीत खेळ करण्याचा प्रयत्न करणार असून, ते शिवसेना शिंदे गट व भाजपाचे आपसात फाटणार कसे? यावर भर देणार असल्याचे त्यांनी परखड विधान केले आहे.
आगामी काळात जिल्हा परिषद नगर परिष व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान आज संजय गायकवाड यांनी एका पत्रकार परिषदेतून महायुती सदर निवडणूक लढविणार असल्याचे सांगून प्रसार माध्यमांपुढे आपले मत मांडले.सदर निवडणूकीसाठी नव्याने पक्ष बांधणी होणार असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व फिल्डींग लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, मेहकर येथे आमच्याच हक्काची मते विरोधकांकडे गेली त्यामुळे विधानसभेत आमच्या पक्षाचा उमेदवार पडला. आगामी जिल्हा परिषद,नगर परिषद व पंचायत समिती निवडणूकीत तीनही पक्ष एकत्रित येणार आहे.विधानसभा निवडणुकीत आर एस एस व भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले परंतु भाजपाचे विजयराज शिंदे आणि योगेंद्र गोडे यांचा आगामी निवडणुकीत देखील आमचा खेळ करण्याचा प्रयत्न असणार आहे,असाही आरोप त्यांनी आरोप केला आहे.
(क्रमश:)