मोताळा (हॅलो बुलडाणा) परभणी येथील पोलिसांच्या अमानुष मारहाणीत भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनेतील मुख्य आरोपींना आणि सूत्रधाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिव-फुले-शाहू-आंबेडकर अनुयायांच्या वतीने आज मोताळा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते! जयश्रीताई शेळके यांनी सहभागी होऊन तीव्र भावना व्यक्त केल्या.या मोर्चाला प्रचंड संख्येने महिला व पुरुष बांधवांनी उपस्थित राहत निषेध व्यक्त केला.
यावेळी मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनावर डि.टी.इंगळे,अरुणभाऊ डोंगरे, लक्ष्मणराव गवई,भीमराव शिरसाठ,निळकंठ वानखेडे,साहेबराव डोंगरे,अनिल खराटे,ॲड.सतीषचंद्र रोठे,संतोष मेढे,कैलास खराटे,संदीप मोरे,संदीप वानखेडे,विनोद धुरंधर,विनोद सावळे,अजय खराटे,जितेंद्र खराटे,बाळासाहेब अहिरे,शेख साबु,एस.पी.अहिरे,विजय सुरडकर,सॅंडी मेढे,राजु वाघ इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.