बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सध्या पावसाळी दिवस आहेत. पाऊस धारेत आपण चिंब झाले असाल आता 29 जूनला बुलढाणा अर्बन क्रिएटिव्ह ग्रुपच्या सौजन्याने सायंकाळी साडेसात ते दहा वाजता बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरच्या रंगमंचावर हिंदी गीतांच्या सुरेल सरी बरसणार आहे. बुलढाणा अर्बन क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने दिव्य सेवा प्रकल्पाच्या मदतीसाठी ‘गाता रहे मेरा दिल’ हा गान कोकिळा लतादीदींच्या हिंदी गीतांचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात नृत्यविष्कार सादर होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख गायक अनंत देशपांडे, ग्रुप व्यवस्थापन व गायक उमेश अजनकर कार्यक्रमात रंग भरतील. संगीत संयोजन प्रशांत ठाकरे यांची राहणार असून गायक रामेश्वर काळे, मनीष काबरा, गायिका शितल तायडे, गौरी शिंदे हे कार्यक्रमाला बहरदार करणार आहेत.नृत्य दिग्दर्शक प्रकाश मेश्राम म्हणून राहतील तर सूत्रसंचालनाची धुरा नासिरखान सांभाळतील. प्रकाश योजना अमोल आढाऊ यांची राहणार आहे. या कार्यक्रमाचा बुलढानेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- Hellobuldana