बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आज मंत्रीपदाचा विस्तार असून, शपथविधीसाठी संभाव्य मंत्री नागपुरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे भाजपा आमदार आकाश फुंडकर यांना फोन आल्याची चर्चा असली तरी, आणखी एक नाव चर्चेत आहे. अद्याप कुणाच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नाही.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेगवेगळ्या तारखा समोर येत होत्या मात्र आजची तारीख ठरली आहे.आज चार वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नऊ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अकरा त्यासोबतच भाजपकडून 20 ते 21 आमदार शपथ घेणार आहेत. शपथविधीसाठी संभाव्य मंत्री नागपुरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. काही नेत्यांना फोन गेले आहेत, तर काही नेत्यांनी नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत.बुलढाणा जिल्ह्यातून आमदार डॉ. संजय कुटे व आकाश फुंडकर यांचे नाव पुढे येत आहे.
▪️यांचा पत्ता कट?
ज्येष्ठ नेते व आमदार चैनसुख संचेती,विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या पत्नी आ.श्वेता महाले यांचा पत्ता कट झाल्याचे बोलल्या जात आहे.