देऊळगाव मही (हॅलो बुलडाणा) वैदू समाजातील अशिक्षित स्व.गंगूबाई व मल्लू अण्णा राजे यांचे अठरा विश्व दारीद्र्य मध्ये जिवन जगत असतांना स्वतःहाच्या पोटाला पीळ देत दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन आई वडिलांनी त्यांना घडविण्याचे काम केले. साहेबराव राजे या मोठया मुलाने न्यायालयात सहाय्यक अधीक्षक म्हणून काम पाहिले तर दुसरा मुलगा नाना राजे हे सध्या एस.टी.महामंडळात बस चालक म्हणून कार्यरत आहे.अशातच मयुरी साहेबराव राजे या विद्यार्थीनीने शिक्षणाची जिद्द ठेवून अथक परिश्रमातून बी. कॉम.व एम. कॉम मध्ये पदवीधर म्हणून शिक्षण पूर्ण केले. पहिल्याच प्रयत्नात मयुरीला यश आले असून बुलढाणा जिल्हा न्यायालात लिपिक म्हणून तिची निवड झाली आहे. शिक्षणाची कास न धरणाऱ्या वैदू समाजात मयुरी ने उच्च शिक्षण घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.वैदू समाजातील दाई माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्व. गंगूबाई राजे यांना कुठलेही वैद्यकीय शिक्षण नसताना त्यांनी परिसरातील हजारो महिलांच्या प्रसूती करून सेवा देण्याचे काम केले. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेचे फळ त्यांच्या दोन्ही मुलांना व नातवंडाला मिळाले असल्याचे प्रतिक्रिया राजे साहेबराव यांनी बोलतांना दिले.मयुरीच्या उत्तुंग भरारीने सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- Hellobuldana
मयुरीची भरारी ! – जिल्हा न्यायलयात लिपिक पदावर ! -वैदू समाजातील ठरली आदर्श विद्यार्थ्यांनी !

By admin