spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – उबाठाच्या सिद्धार्थ खरात यांना धमक्या! -पराभव पचवता आला पाहिजे! -चारी मुंड्या चीत झाले तरी डॉ. रायमुलकरांचा अहंकार कमी होईना! – आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले..’अंगावर आले तर शिंगावर घेण्याची तयारी’

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी प्रस्थापित शिंदे गटाचे आमदार
डॉ.रायमुलकरांचा दारूण पराभव केल्याने हा पराभव त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी विजयी उमेदवार सिद्धार्थ खरात यांची विजयी मिरवणूक अडवली होती. दरम्यान खरातांना डॉ.रायमुलकर यांनी हातपाय कलम करण्याची धमकी दिल्याने काही काळ वातावरण तापले होते.परंतु संयम बाळगत सिद्धार्थ खरात यांनी मिरवणुकीचा मार्ग बदलविला. दरम्यान ‘अंगावर आले तर शिंगावर घेण्याची तयारी’ असल्याची प्रतिक्रिया खरात यांनी ‘हॅलो बुलढाणा’ला दिली आहे.

आश्वासक चेहरा परंतू नवखे उमेदवार असूनही खरात यांनी 3 पंचवार्षिक आमदार राहिलेले महायुतीचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांचा पराभव केलाय.मेहकर विधानसभा मतदारसंघ हा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर या ठिकाणी संजय रायमुलकर हे 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. परंतु, यावेळेस मंत्रालयीन कामकाजाचा 30 वर्षांचा अनुभव असलेले, राज्य सरकारचे माजी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी रायमुलकरांचा पराभव केला आहे. डॉ संजय रायमुलकर यांच्या पदरात मतदारांनी 99423 मतं टाकली, तर सिद्धार्थ खरात यांना 104242 मतदारांनी भरभरून मते दिली. त्यामुळंच सिद्धार्थ खरात यांचा 4819 मतांनी दणदणीत विजय झालाय. परंतु हा पराभव डॉ.रायमुलकर यांना पचवता आला नाही. सिद्धार्थ खरात यांची विजयी मिरवणूक निघाली असताना दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक अडवली.यावेळी मोठा राडा झाला असता,परंतु मी दोन पावले मागे घेऊन संयम पाडल्याचे सिद्धार्थ खरात म्हणाले.रॅलीचा मार्ग बदलवला. रायमुलकर यांना पराभव पचला नाही,पराभव पचवता आला पाहिजे. त्यांनी 15 ते 20 वर्ष राजकारण केले पण या राजकारणात गुंडशाही दिसून आली.आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेचे राजकारण करण्यासाठी मी प्रयत्न करत असून,जर कोणी ‘अंगावर आले तर शिंगावर घेण्याची तयारी’ असल्याचेही खरात म्हणाले आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!