बुलढाणा (हॅलो बुलडाणा) केवळ 841 मतांनी निसटता पराभव झाला असला तरी, महाविकास आघाडीच्या बोभाटाच्या मशाल चिन्हावर लढलेल्या जयश्री शेळके यांनी ‘यापुढेही लढाई सुरू राहण्याचा प्रण घेतलाय. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याशी संघर्षमय लढतीत त्यांनी अखेरच्या 3 फेऱ्यांमध्ये
निसटता पराभव झाल्यानंतर फेसबुकवर
‘विझलो आज जरी मी,हा माझा अंत नाही.. पेटेन उद्या नव्याने, हे
सामर्थ्य नाशवंत नाही’ ही कविता
पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या की, लोकशाही विरुध्द हुकूमशाहीच्या
या लढ्यात आपण सगळेजण ताकदीने माझ्या सोबत राहीलात. सर्वांचे मनापासून
आभार. बुलढाणा विधानसभा मतदार संघातील ही लढाई सुरुच राहिल, असेही
संकेत त्यांनी या प्रतिक्रीयेतून दिले आहेत.ज्यावेळी मतमोजणीच्या वेळी लीड मागेपुढे होत असताना जयश्रीताई शेळके या मतमोजणी केंद्रात प्रत्यक्ष उपस्थित होत्या. त्यामुळे निकराची झुंज देत जयश्रीताईंबाबत ”खूब लढी मर्दानी..!” अशा भावना व्यक्त होत आहेत.