बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा तालुक्यात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज 19 नोव्हेंबर रोजी समोर आली.
काळी पिवळी वाहन व दुचाकीत भीषण अपघात झाल्याने या दुर्दैवी घटनेत बाप लेकाचा मृत्यू झाला आहे.
विजय शेषराव जाधव वय 40 वर्षे रा कोलवड, कार्तिक विजय जाधव वय 11 वर्षीय रा कोलवड असे अपघातामध्ये ठार झालेल्या बाप लेकाचे नाव आहे.
धाड वरून कोलवडकडे विजय शेषराव जाधव हे आपल्या मुलाला घेऊन गावाकडे परत येत होते. तर धाडकडे काळी पिवळी ही चार चाकी वाहन जात होते. काळी पिवळी वाहनाने दुचाकीला उडविले. हातडी बुद्रुक शिवाराजवळ असलेल्या शिवाजी शाळेजवळ हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दोघांना हलविण्यात आले आहे. कोलवड येथे जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काळी पिवळीचा वाहन चालक हा फरार झाला आहे मात्र पोलिसांनी वाहने ताब्यात घेतलेली आहे. सदर घटनेची पुढील तपास पीएसआय गोकुळसिंग राठोड करत आहे.