spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! राहूल बोंद्रे यांच्या विजयासाठी सर्वच समाज आले एकत्र! शहरातील काॅर्नर सभांना युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!!

चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली विधानसभा मतदार संघातील सर्वच खेड्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांच्या विजयासाठी आवश्यक वातावरण निर्माण झाले आहे.चिखली विधानसभा मतदार संघातील सर्व समाज घटक एकत्र आले आहेत.गावखेड्यांप्रमाणे शहरातील विविध भागातील काॅर्नर सभांना जेष्ठ नागरिक, महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. नेमका यांचा प्रत्यय आज दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील मुस्लिम बहुल भागात झालेल्या काॅर्नर सभांमधील उत्स्फूर्त सहभागावरून दिसून येत आहे .यावेळी बोलताना राहूल बोंद्रे यांनी सांगितले की, आपला मला असलेला भरभक्कम पाठिंबा हाच माझ्या विजयाचा विश्वास आहे. २० नोव्हेंबर रोजीच्या निवडणूक प्रक्रियेत सर्व मतदान केंद्रावर युवकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
नगर परिषद समोरील नूर चौक, बाबुलाॅज चौक, इंदिरा नगर येथील सर्व सभांमध्ये बहुसंख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित असलेला जनसमुदाय हा महाविकास आघाडीच्या विजय निश्चित करणारा ठरतो आहे. रिक्की काकडे यांच्या वतीने आयोजित बैलजोडी चौकातील सभेसाठी चिंच परिसर नागरिकांनी हजर राहून महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांना असलेला आपला पाठिंबा दाखवून दिला.

नेतृत्वाविषयी निरपेक्ष जिव्हाळा ,
राहूल बोंद्रेंना उचलून घेतले खांद्यावर …

चिखली शहरातील विविध भागांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांच्या वतीने दररोज सायंकाळी काॅर्नर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. नूर चौकातील काॅर्नर सभेनंतर ची सभा बाबुलाॅज चौक येथे असल्याने सर्व कार्यकर्त्यांसह राहूल बोंद्रे बाबुलाॅज चौकाकडे निघाले असता राहूल बोंद्रे यांच्या विषयांच्या घोषणा देत युवकांनी त्यांच्याप्रती असलेल्या जिव्हाळ्याने अक्षरश: त्यांना खांद्यावर घेऊन बाबुलाॅज चौक गाठला आणि तेथील सभेनंतर पुढील सभेसाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय प्रवेश द्वारा पासून इंदिरा नगर चौकाजवळ मो. आसिफ यांच्या कार्यालयापर्यंत खांद्यावर आणले. कार्यकर्त्यांची आपल्या नेतृत्वाविषयी असलेली असिम श्रध्दा यावरून दिसून आली. विशेष बाब म्हणजे  इंदिरा नगर परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी मो. आसिफ भाई याच्या मार्गदर्शनाखाली राहूल बोंद्रे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश घेतला.
या सर्व सभांमध्ये प्रामुख्याने हाजी दादू सेठ, रफिक सेठ,डॉ.निलेश गावंडे, नंदू भाऊ सवडतकर, कुणाल बोन्द्रे, हाजी रउफ बाबू, श्रीराम झोरे,निलेश अंजनकर,रवी तोडकर,रहीम पठाण,असिफ भाई, डॉक्टर इसरार,नझीर सेठ कुरेशी, रिक्की काकडे यांनी सहभागी घेतला. यातील प्रत्येक सभेसाठी त्या त्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!