मेहकर (हॅलो बुलडाणा) वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्ष शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या अधिकृत उम्मेदवार डॉक्टर ऋतुजा ऋषांक चव्हाण यांचा विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने गावभेटीचा प्रचार दौरा जोरात सुरु आहे. मेहकर लोणार मतदार संघाचा संपूर्ण आढावा घेतल्यास जनतेचा कौला डॉक्टर ऋतुजाताई चव्हाण यांना आहे असं स्पष्ट दिसतं आहे. रुग्णसेवेची, समाजसेवेची मनाशी खूणगाठ बांधलेल्या ऋतुजाताई चव्हाण यांना विकासात्मक धोरणासाठी मोठ्या आशेने त्यांच्याकडे मतदार संघातील जनता पाहत आहे. उच्च शिक्षित उम्मेदवार आणि विकासाचं विशिष्ट व्हिजन असल्यामुळे डॉक्टर ऋतुजा ऋशांक चव्हाण यांना समाजाच्या विविध स्तरावरून लोकप्रतिनिधी म्हणून सर्वाधिक पसंतीही मिळत आहे. वाढती महागाई, भ्रष्टाचार आणि नारिशक्तीचा बुलंद आवाज, स्थानिक लोकप्रतिनिधी ह्या डॉक्टर ऋतुजाताईंच्या जमेच्या बाजू आहेत. शेतकरी, कष्टकरी जनतेचा मुद्दा असो किंवा गाव, शहरातील आर्थिक विषमतेची दरी, मतदार संघातील अद्यावत आरोग्य सेवेचा प्रश्न असो या प्रत्येक मुद्यावर त्यांनी आपलं परखडपणे मत मांडल आहे.
दिनांक 14 नोव्हेंबरला त्यांनी अंजनी , आंधुड , लोणी गवळी, भिवापूर, दुगबोरी , भोसा , घाटबोरी , टेंबुरखेड या गावाला भेट दिली असता गावगाड्यातील जनतेंनी त्यांना मोठ्या मजबुतीने साथ देण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक गावातून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ही परंपरागत पक्षांची नक्कीच डोके दुखावणारी गोष्ट आहे. डॉक्टर ऋतुजा ऋशांक चव्हाण यांचा एकंदरीत ताफा पाहता या निवडणुकीत प्रत्येकासमोर त्यांच कडवं आव्हान उभं असेल