डोणगाव (हॅलो बुलढाणा) विधानसभा मतदारसंघात निवडणुकीतील कामकाजाची महत्वाची जबाबदारी दिवसरात्र डोळ्यात तेल घालून पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे जेवण नियमबाह्य पद्धतीने दिले जात आहे.मोठा अधिकारी येण्याची वार्ता कळताच मेनू बदलतो त्यामुळे जेवणावर कर्मचाऱ्यांची तीव्र नाराजी आहे. संबधित जेवणाचा कंत्राट घेतलेल्या ‘भाकऱ्या'(अर्थात आपलेच पोट भरणारा) कंत्राटदाराचे पोट मात्र फुगत असल्याचे समजते. त्यामुळे निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.
विधानसभेची निवडणूक निर्विघ्न, शांततेत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी निवडणुकीतील सर्व कामे चोखपणे करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.कर्मचारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करत जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र त्यांना मिळणाऱ्या जेवणावर कोणाचेही लक्ष नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात असलेल्या जेवणात मोठा अधिकारी येत असेल तर जेवण वेगळे नाही तर पुरी आलूची भाजी आहेच! मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातात त्यांचे प्रशिक्षण होते तर दुसरे प्रशिक्षण हे ज्या मतदार संघात नियुक्त्या केल्या त्या मतदार संघात असे दोन प्रशिक्षण होतात तर ई व्ही एम सिलबंद करणे या साठी सर्व शासकीय विभागाचे क्लास वन अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, नायब तहसीलदार असे कर्मचारी असतात तेव्हा त्यांना जेवण देण्यात येते. निवडणूक कर्मचारी निवडणुकीचे कामकाज पार पाडून जेव्हा परत येतात तेव्हा जेवणाचे पार्सल दिल्या जातात. मात्र त्यांना जेवण चांगले मिळत नसल्याचा सूर उमटत आहे.
कामात हलगर्जीपणा केला तर त्वरित कारणे दाखवा नोटीस किंवा कार्यवाही करणाऱ्या निवडणूक विभागा मार्फत मिळणारे जेवण निकृष्ट व कर्मचाऱ्यांना पसंद न येणारे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भीतीमुळे यावर कर्मचारी खुलून बोलत नाही.
▪️संताप येतोय पण सांगणार कुणाला?
12 नव्हेंबर रोजी वखार महामंडळंच्या गोडाऊन मध्ये निवडणूकीसाठी मतदान यंत्र तयार करण्याचे काम सुरु होते, त्या साठी मेहकर व लोणार तालुक्यातील सर्व विभागाचे क्लास वन कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, महसूल सहाय्यक असे 250 पेक्षा जास्त कर्मचारी होते. त्यांना दुपारी जेवणात असलेला मेनू म्हणजे पोळी सोबत वांग्याचे भरीत त्याला पाहता या कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मात्र सांगणार कुणाला? तालुका पुरवठा अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय महसूल अधिकारी सर्वजण तेथेच उपस्थित होते पण जेवणावर कोणाचीही नजर कशी पडली नाही? शिवाय दोन्ही प्रशिक्षणच्या वेळी जेवण दिल्या गेले ते आलूची भाजी सोबत पुरी! पाणी बाहेर जावून पिणे मधात कोणाला ठसका लागला तर त्याला काहीच इलाज नाही तर दुसरीकडे बुलढाणा येथील प्रशिक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट जेवण तर जळगांव जामोद मध्ये बेसन पोळी अश्या जेवणाने निवडणूक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याकडे जिल्हा अधिकारी किंवा निवडणूक निरीक्षक यांनी लक्ष द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.














