बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राजकारणात विकासाचे गाजर दाखवून स्वतःचाच विकास करणारे काही महाभाग आहेत. आमदार म्हणून आणि मंत्रीपद मिळवून डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राजकीय दबावापोटी शासकीय जमीन हडपल्याचा आरोप एका तक्रारदाराने केला आहे.माहिती अधिकारातून ही बाब पुढे आली आहे.त्यामुळे आता सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात लढणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे डॉ. शिंगणे यांच्या तुतारीचा स्वर मंदावल्याचे चित्र आहे.
आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत खंदे समर्थक म्हणून डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात ओळख प्रस्थापित केली होती.दरम्यान शरद पवारांना ऐनवेळी धोका देऊन अजित पवारांनी जिल्हा बँकेला 300 कोटी रुपये दिल्याने डॉ.शिंगणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले.त्यानंतर विधानसभा निवडणूकजवळ येताच त्यांनी पुन्हा अजित पवार यांना धोका देत शरद पवार गटात घरवापसी केली व आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी तुतारी हातात घेऊन सज्ज आहेत.दरम्यान एका तक्रारदाराने माहिती अधिकारातून डॉ.शिंगणे यांच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले आहे.याबाबत त्यांच्या तक्रारीनुसार,
देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे टाकरखेड भागिले येथील सरकारी ई वर्ग 10 हेक्टर आर जमीन संत चोखामेळा सहकारी सोसायटी प्रक्रिया कारखाना मर्यादित देऊळगाव राजाच्या नावाखाली डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान मंत्री असताना खोटे कागदपत्र तयार करून व भाडेपट्ट्यावर घेऊन अटी व शर्तीचा भंग केला.संबंधित अधिकारी व प्राधिकरण यांच्याशी हात मिळवणी करून व पैसे देऊन आणि राजकीय दबावतंत्राचा वापर करूनहवे तसे कागदपत्र प्राप्त करून घेतले.शासनाकडून गट नंबर 198,199 व 205 मधील 10 हेक्टर आर जमीन शेतीवर आधारित उद्योग प्रक्रिया करिता फसवणुकीच्या मार्गाने प्राप्त केली.याप्रकरणी जिल्हा महसूल प्रशासनाने कारवाई टाळली तर देऊळगाव राजा तहसीलदाराने अटी व शर्तीचा भंग केल्या प्रकरणी जमीन सरकार जमा करण्याचे आदेश दिले असतानाही कारवाई करण्यात आली नाही.असे वास्तव माहिती अधिकारातून समोर आले आहे.(या प्रकरणातील पुढील माहिती भाग 2 मध्ये क्रमाश: प्रकाशित करण्यात येणार आहे)














