बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भाऊबीज म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव ! या दिवशी बहीण भावाचे औक्षण करून त्याच्या सुखी जीवन आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते..जयश्रीताई अनेक वर्षापासून करत असलेली प्रार्थना आज फळाला आली आहे असे त्यांच्या भावांना वाटते. त्याचे कारणही असे आहे की,हजारो भावांनी जयश्रीताईंना यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ‘आमदारकीचे’ गिफ्ट देणार असल्याचे कबूल केले आहे.त्यामुळे ताईंनाही भाऊबीज पावली!असे म्हणण्यास काही हरकत नाही.
प्रचलित कथा नुसार,सूर्याची मुले यम आणि यमी हे दोघे भाऊ- बहिण होते. बहिणीला अनेक वेळा भेटायला घरी बोलावल्यावरही बहिण भावाला भेटायला गेली नाही म्हणून मग यमच बहिणीकडे तिला भेटायला पोहचला. तेव्हा बहिणीने भावाला ओवाळून त्याला स्वादिष्ट भोजन देऊन त्याची ओवाळणी केली. भावाला सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तेव्हा पासून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो, असे मानतात.परंतु जयश्रीताई भावासाठी केव्हा पासूनच जीवाचे रान करत आहेत.सर्वच क्षेत्रातील प्रश्न सोडवित असून परिवर्तनासाठी झटत आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चितच दिसत असून आज भावांनी दिलेला आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे.विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील व घटक पक्षातील दिग्गज नेते कार्यकर्ते जयश्रीताईंच्या हाताला हात देऊन महायुतीचा पराभव करण्यासाठी सज्ज झाले आहेत.बुलढाणा विधानसभा मतदारसंघात त्यामुळे मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले.यंदा आपल्या लाडक्या ताईला विधानसभेत पाठवायचं असा निर्णय भावांनी एकमताने केला आहे.ताईंना विधानसभेत पाठवायचे अशा प्रतिक्रिया हजारो भावांनी व्यक्त केल्या आहे.