बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना पक्षाने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्या नंतर शिवसेना नेत्या प्रेमलता सोनोने बुलढाणा विधानसभा निवडणुक लढण्यावर ठाम असुन मतदारसंघातील मायबाप जनतेच्या मनातील आमदार करण्या करीता त्या आज सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. प्रेमलता सोनोने यांनी शिवसेना पक्ष बुलढाणा विधानसभा मतदारसंघात पहिली बंडखोरी करत त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहे. महायुती कडुन विद्यमान आमदार संजय गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महा विकास आघाडी च्या वतीने जयश्री शेळके यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडी ने आधी सदानंद माळी व नंतर प्रशांत वाघोदे यांना उमेदवारी देत मतदारसंघात अनेकांना धक्का दिला आहे. अश्यातच प्रेमलता सोनोने निवडणूक लढत असल्याने दोन भागात विभागलेल्या विधानसभा मतदारसंघातील घाटा खालील भाग आलेल्या मोताळा तालुका प्रेमलता सोनोने यांचे माहेर आणि सासर दोन्ही असल्याने हीच त्यांची जमेसी बाजु असणार आहे. मतदार संघातील मायबाप जनता आपल्या लेक आणि सुनेला मोठ्या प्रमाणात मतदान रुपी आशीर्वाद देऊन विजयी होण्यास मदत करणार असल्याचा त्याना दृढ विश्वास आहे.
शिवसेना नेत्या व अस्तित्व संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष प्रेमलता सोनोने यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची पूर्ण शक्तीनिशी तयारी करत त्यांनी निवडणूक जाहीर होण्या आधीच संपुर्ण विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रेद्वारे गावोगावी गाठी भेटी घेत तळागाळातील घटकांशी ते प्रत्येक्षपणे संवाद साधत त्यांच्या प्रश्नांचा गुंता सोडविण्या साठी आपण कश्या प्रकारे प्रयत्नशील आहोत यांची सखोल माहीती त्यांनी आपल्या या यात्रे दरम्यान दिली आहे. या आधी सुद्धा प्रेमलता सोनोने यांनी ‘अस्तित्व ‘संघटनेच्या माध्यमातून 25 वर्ष वंचित घटकांना न्याय देण्यासाठी घालविली यामध्ये त्यांची आंदोलने अभिनव ठरली.आता त्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढण्यावर ठाम असुन उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे विरोधी पक्षासह स्व पक्षीयाची सुद्धा डोकेदुखी वाढली असुन प्रेमलता सोनोने यांनी घतलेल्या निर्णयामुळे कोणाच गणित जमत आणि कोणाच गणित बिघडत हे येणारा काळ च ठरवेल एवढं मात्र निश्चित..