बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा तालुक्यातील भादोला जवळील जेजे स्मार्ट स्कूल जवळ भीषण अपघात झालाय. आकाश गवई वय 25 वर्ष रा. भादोला व धम्मपाल मिसाळ वय 38 वर्ष रा. भादोला हे दोघेजण अत्यवस्थ झालेत. खामगाव मार्ग सध्या तरी सुरळीत झालेला नाही.त्यामुळे ते नियमित अपघात घडत असतात. आताही गंभीर अपघात झाला असून दोघेजण रस्त्याच्या बाजूला पडलेल्या अवस्थेत काही नागरिकांना आढळून आले.काही जागरूक नागरिकांनी 108 नंबर वर कॉल करून ॲम्बुलन्स बोलावली व त्यांना ॲम्बुलन्स मध्ये टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आकाश गवई यांची तब्येत गंभीर असल्याकारणाने त्यांना छत्रपती संभाजी नगर येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे.