बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही विरुद्ध हुकुमशाही पाहायला मिळतेय.परंतु या गुंडशाही विरुद्ध प्रामाणिकपणे लढा देण्याचा प्रयत्न करीत आली असून ही गुंडशाही संपवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात संघर्ष करण्यासाठी मला बुलढाणेकरांनी उतरविले असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही शिवसेना उबाठाच्या अधिकृत उमेदवार ॲड. जयश्रीताई शेळके यांनी आज दिली.अर्थात त्यांनी हाती मशाल घेऊन गुंडशाही दहन करणार असल्याचे सुतोवाच केले आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जयश्रीताई शेळके, शिवसेना (उबाठा) यांना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एबी फॉर्म दिलाय.त्या मुंबईवरून आज बुलढाण्यात पोहचल्या असता,चिखली रोडवरील राजर्षी शाहू बँकेसमोर त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली.ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांच्या उबाठा शिवसेना उमेदवारीचे स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान त्यांनी उमेदवारी मिळाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले.प्रत्येक जण माझ्या पाठीशी असल्याचे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले असून त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाची जोरदार घोषणा केली.दरम्यान
ताईंच्या ‘हाती’ ‘मशाल!’ आल्यामुळे त्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील लोकशाही विरुद्धची गुंडशाही संपविणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
(बातमी क्रमाशा)