सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा/निलेश डिघोळे)सध्या महाराष्ट्र महिला सुरक्षित नाही याचा प्रत्यय परत एकदा आलाय.’तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही?’ असे म्हणत पिडीतेच्या भोवती मोटरसायकल फिरवत
सैराट रोडरोमिओ अखेर जेलात गेले आहे. ही कारवाई किनगाव राजा पोलिसांनी केली.
17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता फिर्यादी रा.राहेरी बु. ही 11 वी चा पेपर देऊन नूतन मा.विद्यालय किनगाव राजा येथून उमरद ते किनगाव राजा रस्त्याने पायी चालत येत असतांना कमक्षा देवी विद्यालयाच्या गेट समोर दोन जण रा.राहेरी बु.हे फिर्यादीच्या मागे मोटारसायकल वरून आले त्या वेळी प्रतीक हा मोटार सायकल चालवत होता. त्यांनी फिर्यादीस अडवून वाईट उद्देशाने ‘तु माझ्या सोबत बोलत जा व तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही ते सांग व माझ्या सोबत बोलत जा ‘ असे वैभव बोलला.प्रतिक याने लगेच मोटार सायकल गोल फिरवली व आम्ही तुला बघून घेऊ अशी धमकी देऊन दोघेही निघुन गेले.
ह्या सर्व प्रकाराने फिर्यादी ही घाबरून गेली व तीने घडलेली घटना तिच्या आई , वडिलांना सांगितली.
त्यांनी दिनांक 22 रोजी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस माननीय ठाणेदार विनोद नरवडे यांना माहिती दिली ठाणेदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही आरोपींना 22 ऑक्टोंबर ला अटक केली. आरोपींवर अप नं. 237/2024 कलम 74,78,351(2),126 BNS 2023 सह कलम 8,12 पोसको अंतर्गत गुन्हा दाखल केला.