बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी विधानसभा तोंडावर येऊन ठेपल्याने इच्छुक उमेदवार सोयीनुसार राजकारण करीत असून वाट्टेल त्या पक्षात प्रवेश घेत आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी देखील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी ‘आम्ही अजित दादा पवार यांच्या सोबत!’ असल्याचे विधान केले आहे.
राकाँच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे पाटील म्हणाल्या की, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिलाशक्ती अजितदादा बरोबरच असणार आहे.कार्यकर्ता पदाधिकारी तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे नेते म्हणजे अजितदादा आहेत. खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करत त्यांच्या सबलिकरणासाठी ऐतिहासिक निर्णय घेणारे अजितदादा असून अजितदादा,
प्रांताध्यक्ष सुनिलजी तटकरे , प्रांतध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वात मी संघटना बांधत असतांना नेहमीच दादांचे वरिष्ठांचे सहकार्य लाभले आहे. अजित दादा अनेक वर्षांपासून राज्याचा कारभार बघत आहेत दादांनी बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी दिलाय. मग शेगाव विकास आराखडा असो, खडकपूर्णा -जिगांव प्रकल्प ला मदत असो, बुडत्या जिल्हाबँकेला निधी तरतूद असो, असे अनेक आपल्या जिल्ह्याच्या हिताचे निर्णय दादांनी घेतले. म्हणूनच येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या आणि समाजातील सर्व घटकाच्या विकासासाठी अजित दादा सोबत राहणार असल्याचा विश्वास अनुजा सावळे यांनी व्यक्त केला आहे.