spot_img
spot_img

घड्याळाच्या काट्यावर ! -ॲड.नाझीर काझीने छोड दिया शिंगणे साहब का साथ ! -ॲड.काझी अजित पवारांना सोडणार नाहीत !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कुणी कोणत्याही पक्षात जावो..आम्ही मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटात सक्रिय असून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपला संभ्रम दूर करावा,असे आवाहन एका पत्रकार परिषदेत ॲड.नाझीर काझी यांनी केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षातील नेते दल बदलूपणा करीत आहेत. परंतू आधी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी गटात जिल्हाध्यक्ष असलेल्या काझी यांनी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांच्या गटात गेल्याने आपली तटस्थ भूमिका ठेवली आहे.तीनशे कोटी रुपये जिल्हा बँकेला मिळाल्याने शिंगणे यांनी शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला होता.आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा घर वापसी केली आहे.परंतु काझी अजित पवारांना साथ देणार आहे. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या सोबत आहोत, जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते
प्रामाणिकपणे काम करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांनी १८ ऑक्टोबररोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती
सोबत आहेत, याबाबत बुलढाणा जिल्ह्यातील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षांमधील कार्यकर्त्यामधील संभ्रम दूर करण्यासाठी सिंदखेडराजा येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

पुढेबबोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा
आम्ही महायुतीचे काम केले, पुढे भविष्यात सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आमचे राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टीचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करणार आहेत. तसेच
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अजित
पवार यांच्या आदेशाने जो पक्ष उमेदवार देईल,
घड्याळ चिन्हावर तो आम्ही निवडून आणू, बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व
महायुती सक्षम असून पक्षाने दिलेला उमेदवार
शंभर टक्के निवडून आणू, अशी माहिती ही
पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी दिली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!