बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खामगाव येथील आमदार आकाश फुंडकर यांच्या कामाने अनेक मतदारांची नाराजी असून ‘आकाश’ ‘जमिनीवर’ येणार ? असल्याची चर्चा रंगत आहे.दरम्यान राणा दिलीप कुमार सानंदा यांचा बोलबाला दिसत असल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या
एका उत्साही कार्यकर्त्याने मोबाईलवर आगामी विधानसभा निवडणुकीत खामगाव मतदार संघात कोण आघाडीवर राहील याबाबत ऑन लाईन सर्व्हे केला होता. यामध्ये चक्क काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराला अनेकांनी कौल दिला अर्थात ते राणा दिलीप कुमार सानंदा होते. विद्यमान लोकप्रतिनिधीला कमी पसंती दर्शविली. त्यामुळे उत्साही कार्यकर्त्याचा हिरमोड झालाय.परिणामी हा सर्व्हेच बंद करण्यात आला.दरम्यान काँग्रेसकडून माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. जर त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा विजय निश्चत मानल्या जात असून विरोधकांचे धाबे दणाणले आहे.