बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना, आता खऱ्या अर्थाने रणनीती आखल्या जात आहे.कोण कोणाला धोबीपछाड देणार? याचाही तर्कवितर्क सध्या लढविल्या जात आहे.
मतदारांच्या तर्क विर्तकानुसार ,
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना यंदाची निवडणूक जड जाणार आहे.महाविकास आघाडी कडून ऐनवेळी कोणता उमेदवार गायकवाड यांना फाईट देईल हे आता तरी सांगता येत नाही.
शिवाय गायकवाड यांनी कोट्यावधींचा निधी खेचून आणला तरी, महापुरुषांच्या पुतळ्यांशिवाय इतर विकास कामे अनेकांना अपेक्षित आहेत. शिवाय गायकवाड यांच्यावर मोताळा येथील एका महिलेने शेत जमीन बळकावल्याचा आरोप केला होता.मुख्यमंत्री बुलढाणा दौऱ्यावर आले असताना पुतळ्यांच्या लोकार्पण प्रसंगी आयोजित सभेत सदर महिलेने गदारोळ घालून जमीन बळकावल्याच्या आरोपाने मतदारांमध्ये महिलेंविषयी सहानुभूती व्यक्त होत होती.परंतु आमदार गायकवाड यांनी हे आरोप धुडकावून लावले. त्यांनी शहरात बरीच विकास गंगा आणलेली आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातही भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांना निवडणूक कठीण जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांची ताकद वाढली असून त्यांनी महाले यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याने ही लढत अगदी चुरशीची होणार आहे.आमदार श्वेता महाले यांनी शेत रस्त्यांमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत बोंद्रे यांनी प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवून ते व्हायरल केले होते.अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी देखील व्हिडिओ व्हायरल मार्फत समोर आल्या.शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्याने शेतकरी महाले यांच्या विरोधात असल्याचे बोलल्या जात आहे.शिवाय अब्जावधीचा भूमिपूजन सोहळा घेतला असताना शासकीय योजनेची भांडी योजना चर्चेची ठरली.अनेक लाभार्थ्यांना भांडी मिळाली नसल्याने व लाभार्थ्यांना केवळ कार्यक्रमासाठी वेठीस धरून बसविल्याने लाभार्थ्यांची प्रचंड नाराजी झाली.त्यामुळे चिखली आणि बुलढाणा विधानसभा ऐनवेळी कोण बाजी मारतो आणि कोणाला धोबीपछाड मिळतो ही येणारी वेळ सांगणार आहे.
क्रमशः










