मेहकर (हॅलो बुलढाणा) तरुणांना रोजगार मिळण्यासाठी उद्धवसेनाप्रणीत शिव उद्योग सहकार सेनेने आयोजित केलेल्या परिसरातील मेळाव्यात शेकडो तरुणांची नियुक्ती झाली. हा मेळावा खामगाव येथे नुकताच पार पडला.
मेळाव्याला वाशिम, नाशिक, बुलढाणा, खामगाव, शेगाव, मेहकर, जालना, जळगाव, नांदुरा, अकोला येथील जवळपास ७५० उमेदवार सहभागी झाले होते. मेळाव्याचे आयोजन शिव उद्योग सहकार सेना जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष तायडे यांनी केले होते. इयत्ता ८ पासून ते पदवीधर तरुणांना विविध पदांची नियुक्तिपत्रे देण्यात आली. जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, डॉ. संतोष तायडे, श्रीराम खेलदार, श्रुती पतंगे, गजानन माने यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. यावेळी संजय बगाडे, रुद्राक्ष कोकणे, सेनेचे जिल्हा सचिव आशिष ठाकरे, डॉ. ज्ञानेश्वर रावणकार, डॉ. अतुल बढे, डॉ. राम वरगट, डॉ. महेंद्र म्हसाळ, संजय कोकणे, अश्विन जाधव, गजानन माने, नीलेश पारस्कर, प्रमोद खंडारे यांनी सहकार्य केले.