बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काँग्रेस पक्षाने सात विधानसभेतून लढण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. संध्याकाळी उशिरा पर्यंत चाललेल्या या मुलाखतीत जिल्हा प्रभारी तथा प्रदेश उपाध्यक्ष ( प्रशासन) नाना गावंडे यांनी मोठ्या संख्येतील इच्छुकांसमवेत एकट्यानींच संवाद साधला.
बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात नुकत्याच जिल्ह्यातील ७ मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात आल्या.शासकीय विश्रामगृहात जिल्हा अध्यक्ष राहुल बोन्द्रे, आमदार धिरज लिंगाडे, श्याम उमाळकर, संतोष आंबेकर, विजयसिंह राजपूत, शिवाजी देशमुख, यांची उपस्थिती होती
केवळ उमेदवारांनाच नाना गावंडे यांच्या कक्षात सोडण्यात आले. सोबत असलेल्या शिष्टमंडळाना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. युवा नेते सतीश महेंद्रे, सुनील सपकाळ, श्लोकानंद डांगे यांच्याकडे यांनी दिवसभर नेटाने ही जवाबदारी पार पाडली. सातही मतदारसंघातील इच्छुकांच्या वैयक्तिक मूलाखती घेण्यात आल्या. मतदारसंघातील काँग्रेसची ताकद, अन्य पक्षांची स्थिती, संभाव्य विरोधी उमेदवार, आजवर केलेले पक्षकार्य, भूषविलेली संघटनात्मक पदे, लढविलेल्या निवडणूका, मला उमेदवारी का ?आदी मुद्दे इच्छुकांनी मांडल्याचे सांगण्यात आले. मनाई असतानाही काही इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन केले.
जयश्रीताई शेळके गैरहजर
शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची चिन्हे असलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघापासून मुलाखतींना सुरुवात करण्यात आली. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, महिला काँग्रेसच्या मीनल संतोष आंबेकर यांनी मुलाखती दिल्या. प्रमुख इच्छुक उमेदवार जयश्री शेळके मात्र यावेळी गैर हजर होत्या. त्यांच्या गैरहजेरीच्या संभाव्य कारणावरून} चर्चा रंगली. चिखली मधून स्वतः जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी मुलाखत दिली. राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार) च्या वाट्यावर जाणार हे नक्की असल्याने सिंदखेड राजामधील मुलाखती केवळ औपचारिकता ठरल्या. मेहकर साठी ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अलका चित्रांगण खंडारे, साहेबराव पाटोळे, विजय अंभोरे यांनी सादरीकरण केले.
खामगाव साठी माजी आमदार दिलीप सानंदा, तेजेंद्रसिंह चौहान, धनंजय देशमुख यांनी आपली बाजू मांडली. मलकापूर मधून विध्यमान आमदार राजेश एकडे यांची उमेदवारी नक्की असे गृहीत धरले जात होते मात्र हरीश रावळ यांच्यासह चार ते पाच जणांनी मूलाखती दिल्या.
▪️बापरे बावीस जण इच्छूक!
जळगाव जामोद मतदारसंघातून तब्बल २२ नेते, पदाधिकारी इच्छुक आहे. यामुळे जळगाव च्या मुलाखती सर्वात शेवटी घेण्यात आल्या. या बावीस जणांनी गावंडे यांच्याकडे आपली बाजू मांडून उमेदवारी मागितली.