लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) शेगाव – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरील शारा गावानजीक दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दरोडोखरांनी बंदुकीचा धाकावर मारहाण करीत लोणार येथील सराफा व्यावसायिका काकडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह साडे 28 लाखांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे.
लोणार येथील आदित्य अजितकुमार संचेती वय ४० वर्ष यांचे सुलतानपूर येथे दर्शन ज्वेलर्स आहे.त्यांनी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान दुकान बंद केले होते. त्यानंतर ते लोणार येथे परत येत असतांना शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शारा येथील वळणावर चोरट्याने पाठलाग करत शाईन कंपनीची गाडी आडवी लावून ३ जणांनी मारहाण केली तसेच बंदुकीचा धाक दाखवत २७ लक्ष ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १ लक्ष रुपये नगदी घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले,लेखनिक गणेश लोढे, विशाल धोंडगे, जमादार संजय जाधव,गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण, विठ्ठल चव्हाण,बिट जमादार संतोष चव्हाण,अनिल शिंदे,गजानन डोईफोडे,गजानन दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.आदित्य संचेती यांना चोरट्याने मारल्याने त्यांना दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील,बुलढाणास्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी भेट दिली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
ही लाखो रुपयांची रोड रॉबरी असल्याने याचा तपास लावून तात्काळ आरोपी अटक करण्याचे पोलिसांपुढे फार मोठे आव्हान आहे. फिर्यादी आदित्य अजितकुमार संचेती यांच्या तक्रारी वरून लोणार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भारतीय न्याय सहींता कलम ३०९ (४)३५१(२)३(५) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले लेखनिक नितीन खरडे करीत आहेत.