बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले यांनी काल चिखलीमध्ये 1538 कोटी रुपयाच्या कामाचा उद्घाटन सोहळा ठेवला होता.या कार्यक्रमाला मंत्रिमहोदय सोबत खासदार रक्षाताई खडसे, व इतरही अनेक मान्यवर बोलावलेले होते.पण शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचा हंगाम असल्याने या कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी जमणार नाही हे जाणून असलेल्या आमदार यांनी याच कार्यक्रमात बांधकाम कामगारांना संसार बाटली साहित्य वाटप केले जाईल, असे निरोप त्यांच्या कार्यकर्त्या करवी प्रत्येक गावात पोहचते केले. त्यामुळे बांधकाम कामगार जे या कार्यक्रमात आले त्या सर्वांना “बांध फेटा आणि बसव कार्यक्रमात ” असा कार्यक्रम करण्यात आला.त्यामुळे उद्घाटनाच्या या कार्यक्रमात जरी गर्दी वाढलेली दिसली तरी मुळात जे बांधकाम कामगार आपले संसार बाटली साहित्य घेण्यासाठी आलेले होते त्यांना साहित्य मिळालेच नाही.व त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शनही करण्यात आले नाही त्यामुळे शेकडो जणांना दसऱ्याच्या दिवशी संसार बाटली किट घेण्यासाठी बोलावले होते.सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपाशीपोटी अनेक गावातून आलेल्या कामगारांचा शेवटी संयमाचा बांध फुटला.
अनेक माता-भगिनींची दसऱ्याच्या दिवशी झालेली होरपळ माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या कानावर गेल्यानंतर राहुल बोन्द्रे या ठिकाणी पोहचले व त्यांनी परिस्थितीची माहिती घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावरही फोनद्वारे ही माहिती घातली, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्यामुळे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी या लोकांसोबत जोपर्यंत यांना संसार बाटली कीट मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांचेसोबत बसून राहणार असल्याचे घोषित केले.याप्रसंगी माजी आमदार राहुल बोंद्रे भावनिक झाल्याचे दिसून आले.
सरकारी पैशातून बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या संसार बाटली किटचे श्रेय आपल्याला मिळावे म्हणून आमदार महाले यांनी बांधकाम कामगार असलेल्या शेकडो महिला व पुरुष बंधू भगिनींना उपाशीपोटी दसरा साजरा करायला लावला!या हजारो लोकांचा जसा दसरा तसाच दसरा आपलाही!असे आवाहन करून राहुल बोन्द्रे व त्यांच्या साथीदारांनी उपाशीपोटी असलेल्या सर्वांच्या नाश्तापाण्याची सोय केली व जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही व संसार बाटली किट मिळत नाही तोपर्यंत आपणही त्यांचेसोबत उघड्यावरच बसून राहणार असल्याचे घोषित केले.
सरकारकडून बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या संसार बाटली किटचे प्रत्येक ठिकाणी मेळावे घेऊन आमदार श्वेताताई यांनी, ज्या बांधकाम कामगारांचे राजकीय मतात रुपांतर करण्याचे प्रयत्न केले होते, राहुल बोंद्रे यांनी जमिनीवर बसून त्यांच्या मागील एक ते दोन महिन्याच्या मेहनतीवर पाणी फिरवाल्याचीही चर्चा संपूर्ण चिखली विधानसभा मतदार संघात जोरात सुरु झाली आहे.