बुलडाणा (हॅलो बुलढाणा) कोट्यावधींच्या विकासकामांचा फुगलेला आकडा..जाहिरातींवर लाखोंचा खर्च आणि विशेष म्हणजे लोक प्रतिनिधींकडून कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी भारीच शक्कल लढविण्यात आली ती काल महायुतीच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील भूमिपूजन कार्यक्रमात! बांधकाम कामगार लाभार्थ्यांना ‘संसार बाटली’ देण्याची लालसा देऊन गर्दी जमिनीत आली. सकाळी १० वाजता पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत या लाभार्थ्यांना चहा पाण्याविना बसवून ठेवून लोकप्रतिनिधींनी आपल्याच कौतुकाचा ढोल बडवला.एक महिला तर भोवळ येऊन पडली. महिला पुरुषांच्या एकत्रित गर्दीत धक्काबुक्की होऊन नागरिकांचे प्रचंड हाल झाले. हा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला आहे.
आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजना व अमृत २.० या योजनेतून १३२
कोटी रुपये किंमतीच्या थ्री वॉल्व्ह पाणी पुरवठा योजनेसह एबिडी आणि हॅम अंतर्गत रस्त्यांची कामे अशा एकूण १५३८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
११ ऑक्टोबरला तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणात पार पडले आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला तर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते या विकासकामांचे
उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.दरम्यान या कार्यक्रमाला गर्दी व्हावी म्हणून आयोजकांनी विधानसभा मतदारसंघातील संसार बाटली योजनेच्या लाभार्थ्यांना ‘भांड्यांची किट देण्यासाठी ‘बोलाविले होते.त्यामुळे भांड्यांचा सट मिळणार म्हणून लाभार्थ्यांनी सकाळी सात ते आठ वाजता पासूनच कार्यक्रम स्थळी गर्दी केली होती. दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत सदर लाभार्थी भांडे मिळण्याच्या प्रतीक्षेत होते.परंतु त्यांना उद्या तुमच्या गावाला घरपोच भांडे मिळतील असे कार्यक्रमानंतर सांगण्यात आले.सकाळी सात वाजता पासून आलेल्या लाभार्थी नागरिकांना दहा ते पाच पर्यंतच्या कार्यक्रमाचा कंटाळा आल्याचे प्रकर्षाने दिसून आले.महिला व पुरुषांची गर्दी असल्याने धक्काबुक्की मुळे अनेकांचे हाल झाले.एक महिला तर बेशुद्ध पडली होती तिला ॲम्बुलन्स मध्ये टाकून उपचारार्थ हलविण्यात आले. आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी नागरिकांना योजनांचा लाभ देण्याचे आमिष दिले जात आहे.परंतु संसार बाटली ही सरकारची योजना असून बांधकाम कामगार कार्यालयअंतर्गत भांड्याची किट वाटप करणे गरजेचे आहे. या योजनेची लोकप्रतिनिधींचा काही संबंध येत नाही.तरी देखील क्रेडिट घेण्यासाठी आणि कार्यक्रमाला गर्दी करण्यासाठी लोकप्रतिनिधी ही योजनाच आपल्या ताब्यात घेऊन जणू मीच हा लाभ तुम्हाला देत असल्याचे भासवित असल्याचा आरोप देखील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला आहे.उद्या तर शासकीय स्वस्त धान्य दुकानातील राशन देखील लोकप्रतिनिधी आपल्या घरातून वाटतील असा देखील टोला ही बोंद्रे यांनी लगावलाय.