देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) ‘मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींवर आनंदाचा पाऊस तर पंतप्रधानांच्या घरकुल योजनेतील बहिणींवर चिंतेचे ढग’ या ‘हॅलो बुलढाणाच्या’ वृत्ताची आधी युवा सेनेने दखल घेत शासन दरबारी निवेदनातून मागणी रेटली होती.’हॅलो बुलढाणा’चाही पाठपुराला सुरू होता.अखेर या मागणीला यश आले असून पंतप्रधान आवास घरकुल अनुदानाचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
‘हॅलो बुलढाणा’ नेहमीच ज्वलंत समस्यांचा वेध घेत असते. नुकताच ‘मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींवर आनंदाचा पाऊस तर पंतप्रधानांच्या घरकुल योजनेतील बहिणींवर चिंतेचे ढग’ हा वृत्तांत प्रकाशित करण्यात आला होता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा एकीकडे होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने कार्यान्वित झालेली मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थी मात्र पाच महिने उलटून गेले तरी दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानापासून ते वंचित असल्याची सत्यता मांडली होती.नवीन घरकुलात जाण्याचे स्वप्न भंगते की काय असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता.या वृत्तातील समस्या लक्षात घेऊन देऊळगावराजा येथील युवा सेनेने सदर मागणी शासन दरबारी निवेदातून रेटली होती.युवा सेनेने सह ‘हॅलो बुलढाणा’ ने याचा पाठपुरावा देखील केला.अखेर या मागणीला यश आले असून पंतप्रधान आवास घरकुल अनुदानाचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी युवासेनेसह ‘हॅलो बुलढाणा’ चे आभार व्यक्त केले आहे.