मलकापूर (हॅलो बुलढाणा /रविंद्र गव्हाळे) जोरदार पाऊस झाल्याने नळगंगा धरण 100 टक्के भरले असून धरणाचे 11 दरवाजे उघडले आहेत तर नदीकाठच्या गावांना पूर्ण यंत्र कक्षाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये नळगंगा नदीवर सर्वात मोठ्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे.या धरणातील पाण्याचा मोताळा,नांदुरा व मलकापूर तालुक्यातील जलसिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ होत असतो परंतु अनेक वर्षानंतर नळगंगा धरण 100 टक्के भरल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.11 ऑक्टोंबर रोजी हा इशारा देण्यात आला असून धरणातील जवळपास 11 दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुसकान झाले आहे. रात्री 11:00 वाजेपासून ते सुमारे साडेतीन पावणे चार च्या सुमारास पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बऱ्याच नदी नाल्यांना पूर येऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान मळगंगा चे 11 गेट उघडल्यामुळे शेलापुर, तळणी, भोरटेक, पिंपळपाटी, गुसर, दाताळा, निंबारी, वाकोडी, कुंड, तांदुळवाडी, तालखेड, म्हैसवाडी,नरवेल, दसरखेड एमआयडीसी तसेच मलकापूर शहरातील दोन भागातील गाडेगाव,संत रोहिदास महाराज नगर, ज्ञानेश्वर नगर, माता महाकाली नगर, पारपेट, सालीपुरा, गंगेश्वर मंदिर इत्यादी भागांमध्ये अचानक पाणी शिरले त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. परिणामी रोजच्या जीवन उपयोगी वस्तू व खाण्यापिण्याच्या साहित्याची मोठी हानी झाली आहे.