लोणार (हॅलो बुलढाणा/राहूल सरदार) परिसरात अवैध देशी विदेशी दारू विक्री धडक्यात सुरू असून पोलिसांनी एकुण ८४७५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्तीची कारवाई केली आहे.
८ ऑक्टोंबरला पोलीस स्टेशन लोणार व स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांना गोपनीय माहिती मिळाली कि, ग्राम सावरगांव मुंढे येथे गावात काही इसम दारू विकी करित आहेत.अशा खबरेवरून पोलीस स्टेशन लोणारचे पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक. धनंजय इंगळे, स.फौ. राजकुमार राजपुत (स्थागुशा), बीट जमादार गजानन सापन, पो का कृष्णा निकम, पोका विजय वारूळे गजानन दराडे यांचे संयुक्त पथक तयार केले. सदर पथकाने साध्या वेशात ग्राम सावरगांव मुंढे येथील तांडा येथे जावुन लोणार जिंतुर रोडवर असलेल्या मधुकर तुळसीराम चव्हाण हा त्याचे किराणा दुकानात अवैध्यरित्या देशी व विदेशी दारूची व्रिकी करतांना मिळुन आल्याने त्याचे दुकाची झडती घेतली असता इंपेरिअल ब्लु कंपनीच्या १२ बॉटल प्रत्येकी कि.१६० रू., एमडी कंपनीच्या १६ बाटल्या प्रत्येकी कि.१५० रू., बी-०७ कंपनीच्या ०२ बाटल्या प्रत्येकी कि. १६०, देशी दारू भिंगरी संत्रा १८० एमएल.च्या १० बाटल्या प्रत्येकी कि.७० रू., देशी दारू भिंगरी संत्रा ९० एमएल.च्या ११ बाटल्या प्रत्येकी कि.३५ रू, रॉयल चालेंजर कंपनीच्या बीअरच्या १७ बाटल्या प्रत्येकी कि.१०० रू., टयुबर्ग कंपनीच्या बीअरच्या ०७ बाटल्या प्रत्येकी कि.१५० रू असा एकुण ८४७५ रूपये किंमतीचा माल मिळुन आला. त्यानंतर त्याच गावातील पंढरी रामकिसन नागरे व आनंदा राधाकिसन मुंढे हे रोडला लागुन असलेलया टिणाच्या शेडमधे देशी दारूची अवैध्य विकी करित असल्याचे प्रत्यक्ष मिळुन आल्याने सदर टिनशेडमधे देशी दारू भिंगरी संत्रा १८० एमल च्या ३३ बाटल्या प्रत्येकी कि. ७० व देशी दारू भिंगरी संत्रा ९० एमएल.च्या ०८ बाटल्या प्रत्येकी कि.३५ रू असा एकुण २५९० रूपये किंमतीचा माल मिळुन आल्याने सदर माल जप्त करून तिन्ही अवैध्य दारू विकी करित असलेल्या इसमांना पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांना समज पत्रावर सोडण्यात आले.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे यांचे नेतृत्वात पोस्टे लोणारचे पोलीस स्टेशन उपनिरीक्षक. धनंजय इंगळे, स.फौ. राजकुमार राजपुत (स्थागुशा), बीट जमादार गजानन सापन, पोका कृष्णा निकम, पोका विजय वारूळे पो का गजानन दराडे यांनी केली असुन पुढील तपास बीट जमादार गजानन सापन व पो का कृष्णा निकम हे करित आहेत.