मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) अवैध बायोडिझेल सर्रासपणे विक्री होत असून याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय.
मलकापुरात ५ बायोडिझेल पंपावर ७ सप्टेंबर रोजी महसूल, पुरवठा विभागाने धाडी टाकल्या नंतर पंप सील करण्यात आले. त्यावेळी घेतलेल्या द्रवपदार्थाच्या नमून्यांचे अहवाल प्राप्त झाल्याने तक्रारीवरून मध्यप्रदेशातील आरोपी जुनेद खान वहीद खान, बेरजारी ता . महेतपूर, जि. उजैन्न, लखन बद्रीलाल प्रजापती (२२) रा. मन्सोर या दोघांवर गुरूवारी रात्री जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्रशासनाने धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये दसरखेड, चिखली रणथम या एकाच ठिकाणी दोन टाक्यांमध्ये केमिकलयुक्त बायोडिझेल आढळून आले. काही पंपधारकांनी टाक्यांतील बायोडिझेल काढून टाकले. फक्त दोन टाकीमध्ये केमिकलयुक्त बायोडिझेल सापडले होते.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बायोडिझेलचे नमुने घेत ते नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. ही कारवाई पुरवठा अधिकारी स्मिता ढाके व अजाबसिंग राजपूत यांनी केली होती. त्यावेळी तहसीलदार आर.यु.सुरडकर यांनी नमून्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. हाँटेल एकता समोरील टिनशेडमध्ये असलेल्या ३ हजार लिटरच्या टाकीतून घेतलेले नमूने सदोष आढळून आले. त्यावरून निरिक्षण अधिकारी स्मीता ढोके यांनी मलकापूर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गंत कलम ३,७ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक हेमराज कोळी करीत होते परंतु आज दिनांक ९ ऑक्टोबर रोजी काही बायोडिझल विक्रत्यानी पुन्हा हा धंदा मलकापूर तालुक्यातील मुक्ताईनगर रोड दसरखेड हायवे क्रमांक ५३ वर जोमाने सुरू केल्याची माहिती आहे. या कडे पुरवठा अधिकारी लक्ष देतील का ?
असा प्रश्न निर्माण झाला आहे.