spot_img
spot_img

दलालांच्या दलदलीत रुतले दुय्यम निबंधक कार्यालय ! -अधिकाऱ्यांनीच पोसले दलाल ?

लोणार (हॅलो बुलढाणा /राहुल सरदार) लोणार येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या काही महिन्यापासून सावळा गोंधळ सुरू आहे.शेतकरी व खरेदी विक्री धारकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दलालांमार्फत आर्थिक लूट होतअसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हे दुय्यम निबंधक कार्यालय आहे आहे की दलालांचे कार्यालय आहे ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कार्यालयातील संबंधित अधिकारीच यामध्ये गुंतल्याने दलाल सैराट झाले असून कार्यालय त्यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप होत आहे.
प्रत्येक खरेदी अथवा विक्रीसाठी त्यांच्या सोबत अधिकाऱ्यांनी पोसलेला दलाल असतोच असे काहीसे चित्र लोणार दुय्यम निंबधक कार्यालयात आहे. येथे लुटीचे आकडे हाजारोतून लाखोकडे पोहचत आहेत.खरेदी-विक्री करणाऱ्या शेतकरी व इतरांना आपल्या खरेदी व्यवहारासाठी दस्त करणाऱ्या नागरिकांना तासनतास बसण्याची वेळ येत आहे. दरम्यान लोणार वकील संघाकडून दुय्यम निबंधक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये एडवोकेट ॲक्ट नुसार दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी विक्रीचे व इतर सर्व व्यवहार करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. आपल्या मालमत्तेची खरेदी अथवा विक्री करताना दलाला मार्फतच व्यवहार करावे लागतात. नंबर लावण्यासाठी जर एखाद्याला पैसे दिले तर त्या वेळेसच खरेदी-विक्रीचा नंबर लागतो जर दलालामार्फत पैसे दिले नाहीत तर शेतकरी व
सर्वसामान्यांना दोन-तीन दिवस नंबर लागण्याची वाट पहावी लागते. त्यामुळे गोरगरीब नागरिक शेतकरी वर्ग कमालीचा हैराण आहे. सध्या सोयाबीन सोगणीचे हंगाम असताना सर्व कामे सोडून लोणार येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बसावे लागत आहे. कर्मचारी व खाजगी कर्मचारी जाणीवपूर्वक खरेदी विक्रीचे सर्व कागदपत्र दलालाकडे पाठवतात व आर्थिक व्यवहार
ठरल्यानंतर त्या व्यक्तीचाच नंबर लावतात.हा प्रकार थांबवण्यात यावा व एडवोकेट ॲक्ट नुसार या ठिकाणी दस्तऐवजाचा व्यवहार करण्यात यावे अशी मागणी लोणार वकील संघाकडून करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!