बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्थानिक जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथील विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नंतर महाविद्यालय युवा महोत्सव मध्ये सहभागी झाले होते.हा युवा महोत्सव शंकरलाल खंडेलाल कॉलेज अकोला येथे 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर यादरम्यान संपन्न झाला यादरम्यान विविध कलाप्रकारांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले सर्वप्रथम प्रश्नमंजुषा वादविवाद वक्तृत्व या कला प्रकारात श्रुती तायडे,गोपाल इंगळे व शैलेश सजगुरे यांची निवड सेकंड राउंड साठी झाली होती.
स्पॉट फोटोग्राफी यामध्ये मयूर कंकाळ,भारतीय समूहगान यामध्ये ए मेरे वतन तुझ पे मेरी कसम हे देशभक्ती गीत व लोकगीत या कला प्रकाराचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली. यामध्ये अंकिता सोनुने,प्रियंका महाले, रवीना खरे स्नेहल चव्हाण, प्रतीक्षा डुकरे, आदित्य धोरण इत्यादींनी गायन केले तर साथ संगत तबला श्याम मानकर ढोलक संकेत बगाडे हार्मोनियम प्रा गजानन लोहटे पोस्टर मेकिंग कु मनीषा बशिरे , त्यानंतर लोकनृत्य या कला प्रकारामध्ये अतिशय सुंदर सादरीकरण केले यामध्ये शेख जाहेद शेख, मयूर कंकाळ साक्षी मोरे स्नेहल तायडे कोमल कुमावत यशस्वी गवई राजकन्या सोनूने कांचन हिवाळे रोहित बंडे, तनिष्क नरवाडे पायल पुरभे सुरडकर सृष्टी नरवाडे इत्यादी विद्यार्थ्यांनी नृत्य केले. साथसंगत तबला श्याम मानकर ढोलक संकेत बगाडे हार्मोनियम प्रा. प्रीती आराख यांनी केले. तबला सोलो वादन प्रकारात संकेत बगाडे यांनी सादरीकरण केले . मेहंदी या कला प्रकारात कु.मयुरी बुडुकले तर रांगोळी या कला प्रकारात अपूर्वा पिटकर हिने सादरीकरण केले. संघव्यवस्थापक म्हणून संगीत विभाग प्रमुख प्रा गजानन लोहटे सह संघव्यवस्थापक डॉ प्रदीप वाघ महिला संघ व्यवस्थापक प्रा प्रीती आराख यांनी जबाबदारी पार पडली अशाप्रकारे विविध कला प्रकारामध्ये जिजामाता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारामध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन करून प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळविला. या संपूर्ण युवा महोत्सव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन गवई, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक डॉ एस एन चिंचोले, कला शाखाप्रमुख डॉ जे जे जाधव विज्ञान शाखाप्रमुख संतोष कुंभारे, यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झाला.