spot_img
spot_img

आता MH 28 नव्हे तर MH 56 ! -खामगावात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याचा शासन निर्णय !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याचे विभाजन करून खामगाव जिल्ह्याची नव्याने निर्मिती व्हावी अशी मागणी फार जुनी आहे.तसा प्रस्ताव शासनाकडे अनेकवर्षापासून धूळखात पडून आहे.मात्र राज्यातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा मार्ग अजूनही काही मोकळा झालेला नाही.मात्र शासनाचे खामगाव जिल्ह्या होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी खामगाव येथे एमएच 56 या नोंदणी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) स्थापन करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे आता एम एच 28 नव्हे तर एम एच 56 लागणार आहे. या घोषणेमुळे याभागाचे भाजपचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या मागणीला यश प्राप्त झाले आहे. बुलढाणा जिल्हा हा 13 तालुक्याचा असून घाटावर 7 तर घाटाखाली 6 तालुके आहेत. यामध्ये घाटाखालील नागरिकांना आपल्या वाहनांच्या नोंदणीसाठी बुलढाणा शहरात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाने म्हणजे संपूर्ण दिवस वाया जाने आणि 200 कि.मी.चा प्रवास करावा लागत होता.घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या सहा तालुक्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे यासाठी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी खामगाव येथे आरटीओ कार्यालय होण्याबाबत विधानसभेत आवाज उचलून सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर आज शासनाने उपप्रादेशिक कार्यालयाला मंजूर दिल्यामुळे फुंडकर यांच्या मागणीला यश आले आहे. यानंतर आता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुती सरकारने बहुतांशी आमदारांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पाउले उचललेली आहेत. त्यानुसार आता शासन निर्णयानुसार खामगाव, जि. बुलढाणा येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH 56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!