मलकापूर ( हॅलो बुलढाणा/करण झनके)आदीवासी कोळी महादेव जमातीला राजकीय दबावापोटी ‘जात प्रमाणपत्र’ देत नसल्याने 5 ऑक्टोंबरला जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि.13 ऑगस्ट पासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले होते सदर उपविभागीय अधिकारी यांनी तब्बल 22 दिवसानंतर उपोषण मंडपास भेट देऊन एका महिन्याचा वेळ मागितला त्यामुळे आम्ही अन्नत्याग उपोषणाचे रूपांतर साखळी उपोषणास सुरुवात केली पण आजपर्यंत सुद्धा आम्हाला उडवा उडवीची उत्तरे देऊन वेळकाढूपणा करत आहे आणि त्यांच्या पदाचा दुरुपवयोग करीत आहे,ही एक प्रकारची आदीवासी कोळी महादेव जमातीला हीन दर्ज्यांची वागणूक देत आहे असे आमच्या आदीवासी कोळी महादेव जमातीच्या लक्षात आले आहे अश्या अडेलतट्टू व जातीयवादी आणि राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या उपविभागीय अधिकारी मलकापूर (S D O )यांच्या अश्या वागण्यामुळे आमच्या जमातीच्या शालेय विदयार्थी व इतर शासकीय लाभापासून हा आदीवासी कोळी महादेव जमात वंचित राहत आहे. अश्या उपविभागीय अधिकारी श्री (संतोष शिंदे साहेब )यांच्या कार्याप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊन आदीवासी कोळी महादेव जमातीमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.जर महाराष्ट्र राज्यातील बेरार प्रांतातील आदीवासी कोळी जमातीला असा अधिकारी श्री संतोष शिंदे (S D O )त्रास देत असेल तर ह्या बुलढाणा जिल्यातील आदीवासी कोळी महादेव जमातीने जगावे कसे याकरिता बुलडाणा जिल्ह्यातील आदीवासी कोळी महादेव जमात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला या बुलढाणा जिल्ह्यामधील बेरार प्रांतातील कोळी महादेव जमातिचे शेकडो कार्यकर्ते हे शेवटचा निरोप घेणार आणि यास सर्वश्री जबाबदार उपविभागीय अधिकारी मलकापूर व शासन करते जबाबदार राहतील असे गणेश इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.