बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील एकूण 630000 लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे एकूण 280 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.दरम्यान ज्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील त्यांनी तात्काळ आधार कार्ड सीडिंग करून घ्यावे असे आवाहन देखील जिल्हा महिला बालविकास अधिकारी ऐंडोले यांनी केले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’ची राज्यभरात चर्चा सुरु आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत.लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळत आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.दरम्यान
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पैसे पडल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटली आहे. जिल्ह्यातील एकूण 630000 लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे एकूण 280 कोटी रुपये जमा झाले आहे.