spot_img
spot_img

संडे स्पेशल सक्सेस स्टोरी ! नॉन ओव्हन बॅग निर्मिती उद्योगात ‘कोमल’ ठरली ‘यशस्विनी!’

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) मलकापूर येथील कोमलने उच्च शिक्षण घेऊन एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे.

डिप्लोमा केल्यानंतर शेगाव येथे कम्प्युटर इंजीनियरिंग पूर्ण केलेल्या कोमल साठी नोकरी कुठेही सहज उपलब्ध झाली असती मात्र दुसरा पर्याय म्हणून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी व अभ्यास पुणे येथे सुरू केला दोन-तीन प्रयत्नांमध्ये तिने प्रिलिम्स पर्यंत झेप देखील घेतली. अशातच लग्नासाठी चांगले स्थळ चालून आल्याने मलकाकपूर तालुक्यातील वरखेड येथील इंजिनिअर सचिन तायडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कोमल आपल्या संसारात रमली खरी मात्र घेतलेले उच्च शिक्षण आणि मनातून काहीतरी करण्याची उर्मी तिला स्वस्थ बसू देईना ! नोकरी न करता उद्योग व्यवसायातून सुरुवात करायची असे तिने ठरविले. पीडब्ल्यूडी मध्ये डेप्युटी इंजिनियर असणारे पती आणि सासरकडील सर्व मंडळींनी उत्साह आणि प्रोत्साहन दिले. उद्योग करत असताना दोन गोष्टी काळजीपूर्वक कोमलने लक्षात ठेवल्या त्या म्हणजे आपल्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच इतर काही गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या उद्योग व्यवसायामधून पर्यावरणाचे संतुलन बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. नेमका कुठला व्यवसाय सुरू करावा हे ठरवत असताना शासनाने नॉन ओव्हन बॅग वरील बंदी उठविल्याचे समजले आणि या व्यवसायाच्या दृष्टीने चौकशी सुरू केली. यासाठी आवश्यक असणाऱ्या मशीन पाहण्यासाठी सुरत राजकोट येथे देखील जाऊन आली. खामगाव येथे फॅक्टरी उत्पादन सुरू केले असताना महिला कामगारांसंदर्भात सुरुवातीपासूनच ज्यांना जो वेळ आहे त्या वेळेत येऊन काम करायचे अशी अट ठेवल्यामुळे प्रत्येक महिलेला जसा वेळ मिळेल तशा त्या येऊ लागल्या यामुळे असं झालं की घरकाम किंवा इतर छोटे मोठे उद्योग सांभाळून बॅग उत्पादनातून महिलांना रोजगार मिळू लागला आणि त्यांची होणारी धावपळ देखील थांबली. ३८ लक्ष या योजनेतून मिळालेले कर्ज असताना त्यावर दहा लक्ष पर्यंत शासनाचे अनुदान होते या सुवर्णसंधीचा कोमलने फायदा घेतला. मागील वर्षी जवळपास १४ लक्ष रुपयांची आर्थिक उलाढाल झाली शिवाय यावर्षीची प्रस्थापित आर्थिक उलाढाल २५ लक्ष एवढी आहे. यातून अनेक महिलांचे संसार उभे राहिले आणि कोमलने मनात ठरवलेली यशस्वी उद्योजिका होण्याची गोष्ट प्रत्यक्षात साकारली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!