बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग कार्यक्षमतेने करून राज्य सरकारने जनतेच्या आरोग्य समस्या सोडण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय आयुष , आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा 27 सप्टेंबरला केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते आरोग्य मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीला आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव सौरभ जैन,संचालक हर्ष मंगला महाराष्ट्र राज्याचे आरोग्य संचालक सोहम वायाळ आरोग्य विभागाचे आयुक्त व अभियान संचालक श्रीरंग नाईक यांच्यासह अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विविध योजनांचे सखोल मूल्यमापन आर्थिक आणि भौतिक प्रगती प्रमुख पायाभूत सुविधा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येणारे प्रकल्प आयुष विभाग अंतर्गत येणाऱ्या योजना राज्य सरकारचे औषधी खरेदी धोरण आपत्कालीन सेवा आणि आरोग्य सेवा उपक्रमांतर्गत राज्यात नव्याने सुरू करावयाच्या योजना या संदर्भात चर्चा करण्यात आली . केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या योजना , प्रकल्पाच्या स्थितीची माहिती आयुक्तांनी मंत्री महोदयाच्या निदर्शनास आणून दिली.राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात देशव्यापी आरोग्य सेवा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली . आरोग्य अभियानाच्या उद्दिष्टांची पुर्तता करण्यासाठी राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक काम करावे असे आवहन ही केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले.