spot_img
spot_img

केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आता हा निर्णय घेतला ..!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) देशातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय असणे गरजेचे आहे येणाऱ्या काळात देशातील जनतेला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी एकत्र काम करू असा निर्णय घेतला असून तसे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे .

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आरोग्य मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीला आरोग्य मंत्रालयातील प्रमुख अधिकाऱ्यांसह पंजाब, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल राज्याचे अधिकारी उपस्थित होते . यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्प , मानव संसाधन , राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आर्थिक प्रगती आणि भौतिक प्रगतीचे सर्वसमावेशक मूल्यांकन , 15 वा वित्त आयोग , आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन औषधी योजनाचा आढावा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेऊन योजने संदर्भातील काही सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना केल्यात .देशातील नागरिकांना चांगले आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयातून काम करणे गरजेचे आहे असे सांगून आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांच्या काही सूचनाही त्यांनी ऐकून घेतल्या . येणाऱ्या काळात देशातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र काम करणे गरजेचे आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून लोकांसाठी निर्माण केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि देशात निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्यांचं निराकरण समन्वयातून करणे तसेच केंद्राकडून विविध योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीचा उपयोग त्याच कामावर करणे आवश्यक असल्यासचे त्यांनी यावेळी सांगितले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!