बुलढाणा (हॅलो बुलढाणा) प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२३ -२४ अंतर्गत जिल्ह्यातील २,९५, ३१३ शेतकऱ्यांना रक्कम
रुपये २५२.१५ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली असून त्यापैकी अद्यापपर्यंत २,२४,४८२ शेतकऱ्यांना
रू. १३८.५१ कोटी इतकी नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पिक विमा
कंपनीने एकूण प्रीमियम रकमेच्या ११०% नुकसान भरपाई वितरित केली असून उर्वरित रक्कम पिक विमा कंपनीने राज्य
शासनाकडे मागणी केलेली आहे तसेच रब्बी हंगाम सन २०२३ २४ अंतर्गत १,३५,५५१ शेतकऱ्यांना रू. २४५.४१ कोटी
इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली असून अद्यापपर्यंत ९२८२ शेतकऱ्यांना रक्कम रुपये १२.९३ कोटी इतकी नुकसान
भरपाई वितरित करण्यात आली आहे. ४७७०७ शेतकऱ्यांना रक्कम रुपये ११२. २९ कोटी इतकी नुकसान भरपाई मागील
आठवड्यातच मंजूर झालेली असून दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी सदरील रक्कम NCIP पोर्टलवर अपलोड करण्यात आली
असून पुढील एक-दोन दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्याचे पिक
विमा कंपनीने या कार्यास लेखी कळविले आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे एकूण प्रीमियम रकमेच्या ११०% नुकसान
भरपाई वितरित केली असून उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम पिक विमा कंपनीने राज्य शासनाकडे मागणी केली आहे
सदरील निधी प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. असे पीक विमा कंपनीने लेखी कळविले
आहे.