डोणगांव (हॅलो बुलढाणा /हमीद मुल्लाजी) नुकेतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येवुन बुलढाणा येथे विविध विकासात्मक कामे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करुन गेले, जिल्ह्यात सर्व मतदार संघात विकास कार्या सोबतच सौंदर्यीकरण झाले मात्र मेहकर शहरात अतिक्रमण व धुळ शिवाय काहीच दिसत नाही, मराठा समाज बांधव व शिवप्रेमी जनतेच्या च्या भावनांचा आदर करून मेहकर नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अँड रामेश्वर पळसकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
तश्या प्रकारचे पत्र आ डॉ संजय रायमुलकर यांना पाठविल्या मुळे मेहकर विधानसभा मतदार संघात मोठा चर्चेचा विषय समोर आणला आहे, बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा शहराचा आ संजय गायकवाड , चिखली शहराचा आ श्वेताताई महाले यांनी पहिल्या टर्म मध्येच विकासात्मक कार्या सोबतच शहराचा केलेला कायापालट पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, आपल्या पहिल्या टर्म मध्येच एवढा विकास तर तिन वेळा निवडून दिलेल्या आ संजय रायमुलकर यांनी मेहकर शहराला अतिक्रमण व धुळ शिवाय काहीच दिले नाही,त्याचा त्रास जनता सहन करीत आहे, आमदार महोदयांनी मराठा समाजा सोबतच शिवप्रेमी जनतेच्या भावनेचा आदर करुन विकासात्मक कार्या सोबतच मेहकर नगरीच्या वैभवात भर पाडण्यासाठी भव्यदिव्य शिव स्मारक उभारावे अशी मागणी सकल मराठा समाज व शिवप्रेमी जनतेच्या वतिने माजी जि प सभापती राजेंद्र पळसकर यांचे बंधु व शिंदे गटाचे युवा नेते,अँड रामेश्वर पळसकर यांनी केली आहे.