बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सरपंचांच्या विविध मागण्या जिल्हा सरपंच संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे रेटल्या असून आज या संदर्भात जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
सत्ताधारी सरकार नाकर्ते ठरत असून बुलढाणा जिल्ह्यातील सरपंचांना विविध योजनांमधील निधी अद्याप देऊ शकले नाही.निधी पूर्णतः रखडलेला आहे. जिल्ह्यात अनेक योजनां साठीचा निधी रखडल्यामुळे तसेच किचकट नियमांमुळे अनेक गावकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सरकार व सरपंचांविषयी । रोष तयार होत आहे. बुलढाणा
जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी अनेक वेळा पाठपुरावा करूनही सुद्धा प्रशासनाकडून
कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा रोष वाढत
आहे, तरी गावकऱ्यांच्या व सरपंचाच्या मागण्यांसंदर्भात तातडीने निर्णय
घेणे गरजेचे आहे.असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील गावो गावी विविध योजनांचा निधी रखडल्याने अनेक गावातील विकास खुंटला आहे. विविध योजनांमधील हा निधी मुख्यमंत्री लाडक्या बहिण योजनेत तर वळविला नाही ना?असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे
सरपंच संघटना आक्रमक झाली असून शासन दरबारी निवेदनाद्वारे मागण्या रेटण्यात आले आहेत .
▪️काय आहेत प्रमुख मागण्या ?
शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून रहाणाऱ्या नागरिकांना घरकुलासाठी
जागा नियमाकुल करून देण्यात यावी तसेच घरकुलाचे अनुदान वाढून ग्रामीण भागासाठी किमान 3 लक्ष रु. व शहरी भागासाठी 5 लक्ष रु. करण्यात यावे. घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीने लाभार्थीच्या खात्यावर जमा करावे.गरजवंतांना प्राधान्य क्रम देण्यात यावा.
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांची यंत्रणा ही फक्त ग्रामपंचायतच असावी.
ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोणतेही शाशकीय आथवा निमशासकीय काम दर्जेदार होण्यासाठी ग्रामपंचायतला विश्वासात घेवूनच करावे व ग्रामपंचायतचे कामे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय शासकीय
कंत्राटदारांचे बिल अदा करण्यात येवू नये. विविध योजनेच्या व घरकुलाच्या बांधकामासाठी रेती (रॉयल्टी) उपलब्ध
करून देण्यात यावी.प्रत्येक तालुक्याला व जिल्ह्याला दर्जेदार सरपंच कक्ष तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा.आदी मागण्यांसंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घ्यावे, अन्यथा जिल्ह्यातील सर्व सरपंच लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील याची नोंद घ्यावी. असा इशारा दादा श्रीराम उपकर ,
सलिश अण्णाराव भुतकर, अनिल त्र्यंबकराव पाटील,सौ गया विजेश कि
आउल ,सौ. सुख्खा फेसले आधी सरपंच संघटनेतील पदाधिकारी व सदस्यांनी दिला आहे.