चिखली (हॅलो बुलढाणा) चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे या ऐतिहासिक गावी काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले, आणि लगेच काही वेळात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संतोष काळे यांनी विवेक डुकरे व अमोल डुकरे या दोन बंधूंसह काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे विरोधात,प्रती अन्न त्याग आंदोलन सुरु केले.
आता ही दोन्ही आंदोलने जरी शेतकऱ्यांच्या नावाने चालू असली तरीही दोन्ही आंदोलने राजकीय स्वार्थासाठीच आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, तरी मनोरंजनाचा भाग म्हणजे भारतीय जनता पार्टीने राहुल बोंद्रे या एका व्यक्तीला टार्गेट करून, राहुल बोंद्रे विरोधातच बरेचशे बॅनर व फ्लेक्स छापून आणले, त्यावर सावरगाव गावातीलच बऱ्याच व्यक्तींचे फोटोही टाकले, आता या दोघांच्या भांडणात आपला बळी जाऊ नये म्हणून गावातील बऱ्याच लोकांनी आपापले फोटो त्या बॅनरवरून कापून टाकले.
यापैकी काही जणांना विचारणा केली असता ते म्हणाले की आमदारांकडून विविध राजकीय योजनांचा फायदा देण्याचे आश्वासन देऊन, आमचे फोटो आम्ही गावातील काही कार्यकर्त्यांकडे जमा केले होते.ते फोटो या लोकांनी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वापरले, या दोघांच्या भांडणांमध्ये आमचा बळी जाऊ नये म्हणून आम्ही आमचे फोटो कापून घेत आहोत.आता भाजपाने सावरगाव येथे लावलेल्या प्रत्येक बॅनरवर काही फोटो कापून नेलेले दिसत आहेत, त्यामुळे भाजपाचे बॅनर पाहून लोकांकडून व काँग्रेसकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
असे फोटो कापून नेलेले बॅनर काँग्रेसवाल्यांनी स्टेटसला लावून, भाजपा ला स्वतःचे कार्यकर्ते भेटत नाही मग ते असे गावातील गरिबांचे फोटो नेऊन बॅनरवर लावतात असा प्रचार सुरु केला आहे.बाकी सगळे मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू असल्यासारखे वाटत आहे.