मोताळा (हॅलो बुलढाणा) धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्या या मागणीसाठी तसेच पंढरपूर येथे पंधरा दिवसांपासून राज्यव्यापी आमरण उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांच्या समर्थनार्थ आज मोताळा शहरातील बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्या या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन उपोषण झाली.परंतु ढिम्म सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे.लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष होत असून वैतागलेल्या धनगर समाज बांधवांनी अखेर रास्ता रोको आंदोलनाचा पवित्र घेतला.दरम्यान
या आंदोलन प्रसंगी रमेश धुनके,गोपाल काटे, डॉ.तेजल काळे शांताराम वाघ,योगेश सोनाग्रे,सचिन कवळे,आत्माराम पाचपोळ विलास कवळे,दिलीप बिचकुले,प्रमोद धूनके यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.