बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सिमेंटचे वजनदार इलेक्ट्रिक पोल घेऊन जात असलेले ट्रॅक्टर पलटी झाल्याने तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोताळा तालुक्यातील पुन्हई येथे घडली आहे.
इलेक्ट्रिक पोल घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील पूनई गावाजवळ घडली आहे. हे मजूर इलेक्ट्रिक पोल उभे करण्यासाठी जात असतानाच हा अपघात घडला असून, सर्व मृतक हे खामगाव जवळील वाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघात कसा घडला याबाबत मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.